चाणक्य धोरण असे सांगते की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या तरी अनेक वेगवेगळ्या समस्या असतात. तर त्या समस्या कधी खूप अवघड असतात तर कधी त्या सोप्या असतात. प्रत्येक व्यक्तीला जीवनातील मोठमोठी ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु समस्या उद्भवल्यास घाबरू नका चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा.
ज्यांना समस्यांची भीती वाटते त्यांना कधीही यश मिळत नाही. जेव्हा समस्या येतात तेव्हा लोक घाबरतात, त्यांना त्या समस्येची भीती वाटू लागते, अशा लोकांना कधीच यश मिळत नाही. दुसरीकडे, जे लोक पूर्ण धैर्याने समस्येचा सामना करतात ते यशस्वी होतात.
चाणक्य म्हणतात जीवनात कोणतीही समस्या आली तर त्या समस्येला कधीही स्वत: वर वर्चस्व होऊन देऊ नका. ज्या ठिकाणी समस्यांबद्दल बोलणारी अनेक वेगवेगवेगळी लोक आहेत, त्या ठिकाणी आपली प्रगती कधीही होत नाही, पण याउलट समस्या उद्भवल्यास त्याचे निराकरंत व उपाय सांगणारी लोक अधिक आहेत, त्याठिकाणी आई लक्ष्मीची कृपा नेहमीच असते. जी लोकं स्वतःवर आलेल्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तयार असतात फक्त आणि फक्त त्याच लोकांना यश नेहमी मिळते.