राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मराठी अभिनेत्री रिद्धी हर्षद बुधकर यांनी पक्षप्रवेश केला
दरम्यान , अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुलतान मलदार यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी हर्षद बुधकर, नसरु मुल्ला आणि अमन कुरेशी यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक उपस्थित होते