युवकांना देशाच्या प्रगतीसाठी योग्य दिशेने मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. या उद्देशाने मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या वतीने ‘संवाद साहेबांशी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांचे विचार आणि झंझावताने सर्व महाविद्यालयीन तरुणाईला भुरळ घातली आहे.
दरम्यान, महाविद्यालयीन विद्यार्थांनी शरद पवार यांच्यासोबत संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केल्याने मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने संवाद साहेबांशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारतीय क्रिडा मंदिर, स्टेडीयम, नायगाव क्रॉस रोड, वडाळा, मुंबई येथे 23 फेब्रुवारीला सकाळी 11.30 वाजता ओयोजित केला आहे. या कार्यक्रमात शरद पवार विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, मुंबईचे अध्यक्ष अॅड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
Great content! Super high-quality! Keep it up! 🙂