चाणक्य यांना आचार्य चाणक्य देखील म्हणतात. आचार्य चाणक्यांना भारतातील सर्वश्रेष्ठ अभ्यासक मानले जायचे.चाणक्य स्व:ता एक शिक्षक होते. चाणक्यांना खूप हुशार यादीत गणले जात असायचे.चाणक्य यांचा जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाशी संबंध होता. चाणक्य हे या विद्यापीठाचे विद्यार्थी होते, नंतर त्यांच्या क्षमतेच्या आणि प्रतिभेच्या बळावर ते तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य देखील झाले.
चाणक्यांच्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात ज्ञान हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. चाणक्यचा असा विश्वास होता की कोणत्याही गुरुशिवाय ज्ञान मिळवणे हे शक्य नाही. म्हणून प्रत्येकाने जीवनात आपल्या गुरुचा नेहमी आदर केला पाहिजे. त्यांना वेळोवेळी मानसन्मान दिला पाहिजे.
गुरुशिवाय यश शक्य नाही.चाणक्यच्या मते, जीवनात यश तेव्हाच मिळते जेव्हा योग्य गुरू आपल्याला प्राप्त होतो. ज्ञानाचा कसा आणि कोठे उपयोग करावा यासाठी गुरुचे मार्गदर्शन हे खूप महत्वाचे असते. गुरु हा ज्ञानाचा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, चाणक्यच्या मते, गुरुकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होते, ज्या शिक्षकाने आपल्या शिक्षणावर आणि अनुभवावरुन दिलेले ज्ञान एखाद्या रुग्णाच्या औषधाप्रमाणेच जीवनात उपयोगी पडते.