बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता दाक्षणित्य सिनेमात एंट्री करणार आहे. अनेक वर्ष बॉलिवूडवर आपली छाप पाडून भाईजान सलमान खान आता दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या अपकमिंग गॉडफादर या तेलुगू सिनेमा सलमान खान काम करणार आहे. सलमानने आजवर अनेक तमिळ आणि तेलुगू सिनेमांच्या हिंदी रिमेकमध्ये काम केलं होतं. मात्र सलमान पहिल्यांदा ओरिजीनल तेलुगू सिनेमात काम करणार आहे.
दरम्यान अभिनेता चिरंजीवीने सलमानचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. दोघांचा फोटोदेखील सोशल मीडियावर चिरंजीवीने शेअर केला आहे. सोबत कॅप्शन देत चिरंजीवीने सलमानवर प्रेमाचा वर्षाव केला. म्हटले, “गॉडफादमध्ये सलमान भाईचं स्वागत आहे. तुझ्या एंट्रीने आमच्यात वेगळीच एनर्जी आलीये. आमची एक्साइटमेंट लेव्हल आणखी वाढली आहे. तुझ्यासोबत स्क्रिन शेअर करणं ही फार आनंदाची गोष्ट आहे. तुझ्या येण्याने प्रेक्षकांना एक जादुयी किक बसेल”.