मुंबई : जुन्या मुंबईचे शिल्पकार, चुनाभट्टया आणि मिठागरवाले आगरी या विषयावर ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानातून त्या आगरी समाजाचा चुनाभट्टी व मिठागरांचा व्यवसाय व त्यांचे मुंबईच्या जडणघडणीत असलेले योगदान यावर विवेचन करणार आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात बुधवार दि. ४ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यांनी लिहिलेल्या तसेच बँक ऑफ अमेरिकेच्या सहयोगाने छापण्यात आलेल्या :Lime-kilns, Salterns & the Agris” (the past & the present) या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. 700 रुपयांचे हे पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने रसिकप्रेक्षकांना 600 रुपयांना उपलब्ध होणार आहे.