प्राचीन परंपरा आणि संस्कृतीची साक्ष देणारी संभाजीनगर ही आपल्या राज्याची पर्यटन राजधानी आहे. येथे पर्यटन उद्योगाला चालना देणारे विविध प्रकल्प राबवायचे आहेत. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या पर्यटनाचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान , यानंतर जिल्ह्यातील पृथ्वी अभियानाबाबतची जनजागृती, पुढील रूपरेषा आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेले बदल यावर चर्चा करण्यात आली. या मोहिमेसाठी सर्वांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.