श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजचे प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या प्रमोशनकरीता हॉटेल जाहान नूमा पॅलेसमध्ये गेली होती. त्यावेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेताने ‘मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है’ हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. श्वेता तिवारीचे हे वक्तव्य समोर येताच हिंदू संघटनांनी अभिनेत्रीचा कडाडून विरोध केला.
दरम्यान मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. श्वेता तिवारीने जाहीर माफी मागावी,अन्यथा तिच्या वेबसिरीजचं शुटिंग भोपाळमध्ये होऊ देणार नाही असा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे. आता एफआयआर दाखल झाल्यानंतर श्वेता यावर काय स्पष्टीकरण देतेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.