जवस मध्ये ओमेगा ३ फेटी नावाचे अॕसिड असते. जवसचे तेल स्वयंपाकघरात अवश्य केला पाहिजे. जवसचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
१) जवस वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे खाल्ल्यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहते आणि त्यामुळे अतिखाणे कमी होते. परिणामी वजन कमी होण्यासाठी मदत होते.
२) जवस वापरल्यामुळे शरीरावरील दाह आणि डाग कमी करण्यासाठी मदत होते. तसेच आपल्याला ताजेतवाने आणि तरुण दिसायचे असेल तर जवस फार उपयुक्त आहे.
३) जवसच्या बिया तुमच्या हृदयासाठी योग्य आहार आहे. त्याने प्लाक बनण्याचा धोका कमी होतो, तसेच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक टळते.
४) कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जवस खूप फायदेशीर ठरते. कॉलेस्ट्रॉल कमी असेल तर आपले वजन नियंत्रणात राहते, तसेच हृदयातील समस्या टाळता येतात.
५) मधुमेही रुग्णांसाठी जवस हा पोषक आहार आहे.