सौंदर्य शास्त्रामध्ये कच्च्या दुधाला अतिशय महत्त्व आहे. कच्चे दूध हे त्वचेसाठी ब्युटी एजंट म्हणून काम करते. कच्च्या दुधामध्ये व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात.
- कच्चे दूध हे कोरड्या त्वचेसाठी वरदान ठरते. कच्चे दूध चेहऱ्यावर मॉईश्चरायझरप्रमाणे काम करते.
- नितळ त्वचेसाठी दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड मोठ्या प्रमाणावर असते. कच्च्या दुधाने जर चेहऱ्याला १० ते १२ मिनिटे मालिश केली, तर त्वचेवरील डेड सेल्स निघून जाण्यास मदत होते.
- चेहऱ्यावर सतत फोड येत असतील, तर कच्च्या दुधाचा उपाय करावा, त्वचा ऑईली असेल तर दूध ऑईल बॅलेन्सिंग एजंट म्हणून उत्तमप्रकारे काम करते.
- जर खूप काळ उन्हात राहिल्याने त्वचा काळवंडली असेल, तर नक्कीच इतर कोणतेही महागडे ॲण्टी टॅनिंग क्रिम लावण्यापेक्षा दुधाचा वापर करून पहा. कच्चे दूध टॅनिंग झालेल्या भागावर चोळून लावा.