कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. वानखेडे सध्या दिल्लीत एनसीबीच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. आपल्याला कोणतंही समन्स बजावण्यात आलेलं नाही, असं वानखेडेंनी सांगितलं आहे. मात्र वानखेडे तातडीनं दिल्लीत दाखल झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याच कारणामुळे वानखेडे यांची बदली मुंबईबाहेर केली जाण्याची शक्यता आहे. याबद्दलचे आदेश दोन दिवसांत निघू शकतात. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची दखल वरिष्ठांकडून घेण्यात आली आहे. खाते अंतर्गत चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याला त्या पदावर राहता येत नाही असा नियम आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत वानखेडेंना पदावरून दूर करण्यात येईल. याबद्दलचा आदेश पुढील दोन दिवसांत निघेल.