शारीरिक कार्यांदरम्यान किंवा अनावश्यक ताणल्यामुळं, अतिवापर केल्यानं सामान्यतः गुडघेदुखी सुरू होते. अतिलठ्ठपणामुळं गुडघ्याची समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो. कोणत्याही व्यक्तीच्या उतारवयात किंवा इतर शब्दांत म्हटल्यास वाढत्या वयात, गुडघे दुखणें ही साधारण बाब आहे. गुडघे दुखणें म्हणजे विश्रांती करत असतांना, चालतांना किंवा दैनंदिन कृती करत असतांना गुडघ्याच्या सांध्यामध्ये जाणवणारी वेदना आहे.
गुडघे दुखी वरील काही उपाय-
१) आपले संपूर्ण वजन आपला गुडघा उचलतो. त्यामुळे आपले वजन जेवढे कमी तितका गुडघ्यावरचा भार कमी! म्हणून तरुणपणापासूनच आपले वजन आटोक्यात ठेवणे अति उत्तम.
२) गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करण्याच्या मागे लागावे. गुडघ्याच्या भोवती असलेले स्नायू बळकट होतील असे सोपे व्यायाम शिकवण्यात येतात. ते रोज १० मिनिटे करणे अति उत्तम.
३) शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत.
४) प्रचंड वेदना नसतील तर स्वत:हून फक्त पॅरॅसिटेमॉल (उदा. क्रोसीन)ची गोळी घ्यावी किंवा मलम लावावे.
५) सुरुवातीला पट्टे (नी-कॅप) वापरणे चालू शकते. परंतु त्याचा अतिवापर टाळावा कारण त्याने स्नायू शिथिल होतात.
६) वृद्धापकाळात काठी वापरावी, त्याने गुडघ्यावरचा भार कमी होतो.
७) उत्तम प्रतीची पादत्राणे वापरल्यानेसुद्धा गुडघा सुस्थितीत राहतो.