कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभर 21 दिवसांच्या लॉकडाउनला आजपासून सुरुवात झालीय. या काळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे होत आहेत. सकाळी कमवायचं आणी रात्री खायचं अशी उपजिविका करणाऱ्यांनी आता करायचं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, गरीब लोकांसाठी मदतीचं आवाहनही करण्यात येत आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो आहे. पार्लेजी बिस्कीट हे गरीबांचं खाद्य समजलं जातं. पार्ले कंपनीने मदतीला हात पुढे केले आहे. कंपनी ही पुढच्या तीन आढवड्यात तब्बल ३ कोटी बिस्किट पॉकेट्सचं वाटप करणार आहे.