कोरोनाच्या महासंकटात कोणताही भेदभाव न पाळता कोरोना बाधितांना मदत करावी व या आपत्तीच्या काळात संघटनेचे काम सुरूच ठेवावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी संघ स्वयंसेवकाने उद्देशून केले. स्वयंसेवकांशी ऑनलाइन संवाद साधताना भागवत यांनी सध्या कठीण काळात संघ स्वयंसेवक कार्यरत असून ते सर्वतोपरी सहकार्य करत आहे. अश्या परिस्थितीत सगळ्यांनी संयम आणि काळजी बाळगणे गरजेचे आहे.
दरम्यान, सरकारने दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे. समाजसेवा कोणताही भेदभाव न बाळगता केली पाहिजे. कोरोनाचं संकटावर सरकार योग्यरित्या काम करत आहे. नागरिक सुद्धा कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारला साथ देत आहे. त्यामुळे सेवा करणे हे उपकार नसून कर्तव्य आहे असेही सरसंघचालक भागवत यावेळी म्हणाले.