गेल्या वर्षी कोव्हीड-19 संसर्गमुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळने ‘आरोग्य उत्सव’ म्हणून साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे मंडळाच्या बैठकीत ठरले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे.
दरम्यान, मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध शासनाने घालून दिली आहे. त्याचे काटेकोर पालन मंडळाकडून केले जाईल. भाविकांना लालबाग राजाचे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी मंडळाकडून तयारी केली जाणार आहे.