सध्या बदलते हवामान आणि तापमानातील चढउतार यामुळे बरेच जण विविध प्रकारच्या संसर्गांना बळी पडत आहेत. जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस संसर्ग होतो तेव्हा इतरांनाही तो सहज होण्याची शक्यता असते. संसर्ग टाळण्यासाठी आपल्या सर्वांना या 10 गोष्टी माहीत असायलाच हव्या:
1. आपले हात स्वच्छ धुवा – यामुळे आपल्या हातावरील जंतू निघून जाण्यास मदत होते. खास करुन स्वयंपाक करताना आणि खाण्यापिण्याचे पदार्थ हाताळण्यापूर्वी आपले हात नीट धुवा.
2. वैयक्तिक स्वच्छता राखा – दिवसातून कमीतकमी दोनदा आपले कपडे बदला, कमीतकमी एकदा आंतरवस्त्रे आणि मोजे बदला.
3. इन्फेक्शन टाळण्यासाठी आपल्या वैयक्तिक वस्तू जसे की टूथब्रश, रेझर, टॉवेल्स, रुमाल कुटुंबातील इतर सदस्यांना वापरायला देऊ नका. तुम्हीही कोणाचे वापरू नका.
4. स्वयंपाक करण्याच्या आरोग्यदायी पद्धतींचा वापर करा- भाज्या आणि फळे स्वच्छ धुवा, कटिंग बोर्ड आणि अन्न तयार करण्याची जागा (ओटा) स्वच्छ ठेवा. कच्चे अन्न शिजवलेल्या अन्नापासून दूर ठेवा. शिजवलेले अन्न जास्त काळ बाहेर ठेवू नका. कधीही खराब झालेला पदार्थ किंवा वास येणारा अथवा चव उतरलेला पदार्थ घेऊ नका.
5. लसीकरण पूर्ण करा – पिवळा ताप, रुबेला, टायफाइड, गालगुंड इत्यादी आजारांपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण घेणे.
6. पाळीव प्राण्यांपासून सुरक्षित राहा – झोनोटिक रोग हे प्राण्यांपासून पसरतात. आपल्याकडे पाळीव प्राणी असल्यास, त्यांची नियमित तपासणी करा आणि त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री करा. पाळीव प्राण्यांशी खेळल्यानंतर नेहमीच हात स्वच्छ धुण्याची सवय लावून घ्या.
7. नियमित व्यायाम करा आणि ताजी हवा घ्या – व्यायामामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
8. धूम्रपान आणि धूळयुक्त वातावरण टाळा. आपल्या घराबाहेर अनवाणी चालणे किंवा अस्वच्छ पाण्यात पोहणे टाळा.
9. खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकून ठेवा. बरेच सूक्ष्मजीव आपले नाक, डोळे आणि तोंडातील उबदार आणि ओलसर वातावरणात वाढतात. या भागांना स्पर्श न करणे हा संसर्ग टाळण्याचा उत्तम उपाय आहे.
10. प्रवास करताना काळजी घ्या- आपल्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणांची माहिती घ्या. आपले प्रवासाचे ठिकाण कोणत्याही संसर्गजन्य रोगासाठी परिचित आहे का याबद्दल जागरूक रहा आणि त्यानुसार खबरदारी घ्या. प्रवास करताना कच्चे खाणे टाळा आणि शिजवलेल्या अन्नास प्राधान्य द्या.