मुंबई | भारतीय सेवा नाका कामगार संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती सोहळा उद्या ३ जानेवारी २०२० रोजी सीएसटी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या आझाद मैदानातील मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवनात सकाळी ११.३० ते दुपारी ३.०० वा. आयोजित करण्यात आला आहे. याच सोहळ्यात गेला महिनाभर सुरू असलेल्या नाका कामगार जनजागृती अभियानाचा समारोपही होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षनरेंद्र वाबळे यांच्या हस्ते होणार असून या वेळी सामाजिक कार्यकर्ते आकाश जाधव, सनदी अधिकारी व साहित्यिक जयराम पवार, भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेेेचे प्रमुख संघटक राधेश्याम आडे, सेवा ग्रुपचे ठाणे डायरेक्टर मंगल चव्हाण, नांदेडचे रामराम महाराज भाटेगावकर, ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे राकेश जाधव, सत्यशोधक समाजाचे उल्हास राठोड , उच्च्
न्यायालयाचे अॅड. कनिष्क जयंत, नांदेडचे माजी प्राचार्य मधुसिंग गुलाबसिंग जाधव, सुभाष तंवर ठाणे, ठाणे मतदाता जागरण अभियाना चे
उन्मेष बागवे, अखिल भारतीय मातंग संघाच्या कुसुमताई गोफले, मधुकर जाठोत नवी मुंबई,
भटके विमुक्त नेते डॉ. कैलाश गौड व सुंदरलाल डांगे , ऑल इंडिया डी . टी वेल्फेअर संघाचे राठोड आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या वेळी सेवालाल नाका कामगार महामंडळाची स्थापना शासनाने करावी, ही प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.तसेच भारतीय सेवा नाका कामगार संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते, रुग्ण सेवक, पत्रकार बांधव आणि जनजागृती अभियानात सहभागी बांधवांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या अडीअडचणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व नाका कामगार व सामाजिक संघटनांनी या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन एड, नरेश राठोड व भास्कर राठोड यांनी केले आहे.