थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकारठाकरे यांनी सुरू केलेल्या प्रबोधन या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रबोधनकारठाकरे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘प्रबोधन’ नियतकालिकाची सुरूवात केली. त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले असून त्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. प्रबोधनकारांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करणार असल्याची माहितीही मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
दरम्यान, यावेळी आमदार भास्कर जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, पुस्तकाचे लेखक विजय वैद्य, मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, महेश म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.