मुंबई : सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करणे, रोजंदारी व बदली कामगारांना कायम करणे व सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, सोलापूर शहरातील वाहतूकीचा प्रश्न व सोलापूर महानगरपालिका हद्दीतील विविध नागरी समस्यांचे निवारण करण्याकरीता संबंधित शिष्ट मंडळांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी नगरविकास मंत्री शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.