अठरा वर्षांपूर्वी ‘कोई मिल गया’ या चित्रपटातून जादू आपल्याला पाहायला मिळाला होता. जादू म्हणजेच या चित्रपटातील एलियनने लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांची मन जिंकली होती. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन, अभिनेत्री प्रिती झिंटा आणि रेखा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. कोई मिल गया’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केली आहे.
पण ह्या सर्वांच्या आवडत्या जादूची भुमिका कोणी साकारली होती ? जादू ही भूमिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेते इंद्रवदन पुरोहित यांनी साकारली होती. त्यांनी मालिकेत दयाबेनच्या लांबच्या नातेवाईकाची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी तब्बल ६ भाषांमध्ये काम केले आहे. अभिनेते इंद्रवदन यांचा १८ सप्टेंबर २०१४मध्ये मृत्यू झाला.
या चित्रपटाला १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हृतिक रोशनने सोशल मीडियावर जादूसोबत त्याचा फोटो शेअर करत असे सांगितले आहे की,
‘हे त्याच्यासाठी ज्याने रोहितचं आणि वैयक्तिकरित्या माझ्या आयुष्यात आनंद आणला. माझ्या आयुष्यात जादू निर्माण केली. जादूने रोहितचा हात पकडला, त्याच्या जखमा भरल्या, चमत्कारांमध्ये विश्वास निर्माण केला. जादू जेव्हा रोहितच्या आयुष्यात आला तेव्हा तो फक्त तीन वर्षांचा होता. १८ वर्ष झाली आता तो २१ वर्षांचा झालाय. ‘