छोट्या पडद्यावरील सर्वांचा आवडता शो कौन बनेगा करोडपती लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीप्रमाणेच कौन बनेगा करोडपती चा हा १३ वा सीजन देखील महानायक अमिताभ बच्चन आपल्या हटके अंदाजात होस्ट करणार आहेत. या शोची ऑडिशन फेरी पूर्ण झाली आहे आणि केबीसी चा हा १३ वा सीजन २३ ऑगस्ट पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.
या शो चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. आणि या प्रोमोमुळेच शोसाठीची प्रेक्षकांची आतुरता अगदी शिगेला पोहचली आहे.