कोरोनाच्या उपाययोजनांसाठी शासनाच्या आवाहनाला खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रतिसाद – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरविणार, कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती
कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्यशासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांनीही सहभागी व्हावे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनीधींसमवेत बैठक घेतली. कंपन्यांच्या ‘बैठका व्हर्च्युअली’ घेतानाच ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती अवलंबण्याचे कंपन्यांनी मान्य केले. त्यांच्या माध्यमातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले