मुंबई- ठाणे- नवी मुंबईतील अनेक भागात विज पुरवठा खंडित झाली आहे. मुंबई उपनगरातील मुलुंड, गोरेगाव, ठाणे, चेंबूर, खारघर या शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावरून ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर यासंदर्भात Power Cut नावाचा ट्रेंड देखील सुरू झाला आहे.
दरम्यान, टाटाकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील अनेक भागात विद्युत पुरवठा बंद पडलाय. विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू असून काही वेळात वीज पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले आहे.